Last Updated: Monday, November 28, 2011, 09:18
झी 24 तास वेब टीम, पुणे पुणे जिल्ह्यातल्या राहू गावात झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले. वाळू ठेकेदार संतोष जगताप या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केलेल्या गोळीबारात दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनावणे आणि रामभाऊ सोनावणे ठार झाले, तर त्यांचे इतर दोन सहकारीही या गोळीबारात जखमी झालेत. वाळू ठेकेदारीच्या वादातून ही घटना घडल्याचं सांगण्यात येतं. हे सर्वजण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे.
First Published: Monday, November 28, 2011, 09:18