Last Updated: Sunday, April 29, 2012, 19:39
www.24taas.com, श्रीरामपूर 
श्रीरामपूरमध्ये शऱद पवारांना काळे झेंडे दाखवले आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस प्रश्नावर पवारांना काळे झेंडे दाखवले आहेत. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
श्रीरामपूरमध्ये शरद पवारांना काळे झेंडे दाखवले शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरुन कृषीमंत्री शरद पवारांनी पुन्हा एकदा राज्यपाल के. शंकरनारायणन यांना टार्गेट केलं. राज्यपालांनी स्वत: लक्ष घालून दुष्काळी भागांचे दौरे करावेत.
असे मी जाहीर सांगूनही राज्यपालांना अद्याप वेळ मिळाल्याचं दिसत नाही. अशा शब्दांत खोचक प्रतिक्रिया पवारांनी दिली. राहुल गांधींच्या दुष्काळ भागातील दौऱ्यानंतर तरी ते दौरा करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कालच राज्यपाल के. शंकरनारायण यांना राज्यपालपदाची आणखी एक टर्म मिळाली आहे.
First Published: Sunday, April 29, 2012, 19:39