Last Updated: Monday, November 28, 2011, 08:40
झी 24 तास वेब टीम, सोलापूर सोलापूरमध्ये दोन गटात झालेल्या सशस्र हाणामारीत एक ठार तर पाच जण गंभीर जखमी झालेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजणक आहे.
पूर्ववैमनस्यातून ही हाणामारीची घटना घडली. शहरातल्या जोडबावी पेठ परीसरात ही घटना घडलीय. ठार झालेल्या युवकाचं नाव अल्ताफ शेख असं आहे. हत्तुरे आणि मंगळूरकर या गटातलं भांडण सोडवायला आलेल्या अल्ताफचा मृत्यू झालाय.
First Published: Monday, November 28, 2011, 08:40