Last Updated: Monday, April 30, 2012, 13:45
www.24taas.com, खेड पुण्याजवळ खेड शिवापूर टोल नाक्यावर आमदार संजय पाटील यांना मारहाण करण्यात आली. आमदार असल्याचं सांगूनही मारहाण केल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे. दरम्यान, मारहाण प्रकरणी चार कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे.
आमदार संजय पाटील यांना मारहाण करण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षाने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच राष्ट्रवादीने तासगाव बंदचे आवाहन केले आहे. आमदार पाटील मारहाणीचे परिसरात लगेचच पडसाद उमटलेत. आमदार असल्याचं सांगूनही मारहाण केल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.
टोल नाक्यावर आजही मोठ्या प्रमाणात लूट करण्यात येत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. टोल नाके चालविणाऱ्यांची मुजोरी वाढल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाली आहे. परंतु, सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
First Published: Monday, April 30, 2012, 13:45