Last Updated: Monday, April 30, 2012, 20:15
www.24taas.com, तासगाव 
'झी २४ तास'शी बोलताना आमदार संजय पाटील यांनी जनतेची माफी मागितली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याच्या केलेल्या तोडफोडीबाबत त्यांनी माफी मागितली. तसचं संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई देखील केली जाईल, त्यांना योग्य ते शासन केले जाईल असेही स्पष्ट केलं.
आमदार संजय पाटील यांना टोलनाक्यावर मारहाण झाल्यानंतर पाटलांच्या कार्यकर्त्यांनी खेड शिवापूर टोलनाक्यावर हल्ला करून तो उध्वस्त केला. विधान परिषदेचे आमदार संजय पाटील सांगलीहून मुंबईकडे निघाले असताना टोल देण्यावरून वाद झाला होता. आमदार असल्याचं सांगूनही टोलनाक्यावरच्या
कर्मचाऱ्यांनी वाद घालून मारहाण केल्याचं आमदार पाटलांचं म्हणणं आहे. काही वेळानं आमदार पाटलांच्या कार्यकर्त्यांनी खेड शिवापूर टोलनाक्यावर हल्लाबोल केला. पोलिसांना न जुमानता कार्यकर्त्यांनी टोलनाका अक्षरशः उद्धवस्त केला. दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर हल्ला केला. टोल वसुलीसाठी बसवलेल्या केबिन्स कार्यकर्त्यांनी फोडून टाकल्या.
First Published: Monday, April 30, 2012, 20:15