Last Updated: Monday, April 30, 2012, 21:38
www.24taas.com, कोल्हापूर 
कोल्हापुरात जात पडताळणीच्या कार्यालयाला शिवसेनेनं टाळं ठोकलं आहे. भ्रष्ट्र अधिकाऱ्यांविरुद्ध कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दाखले उशिरा मिळतात, काम मार्गी लावण्यासाठी अधिकारी पैसे मागतात.
असे आरोप करत २५ एप्रिलला शिवसेनेनं आंदोलन केलं होतं. त्यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाचं 'लाच पडताळणी कार्यालय' असं नामकरण केलं होतं. अधिकाऱ्यांच्या टेबलावर दारुच्या बाटल्या ठेवल्या होत्या.
या आंदोलनप्रकरणी संबंधित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळं चिडून आज पुन्हा एकदा शिवसेनेनं या कार्यालयाला लक्ष्य केलं. कार्यालयाला टाळं ठोकून तिथल्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी केली.
First Published: Monday, April 30, 2012, 21:38