Last Updated: Tuesday, May 1, 2012, 20:32
www.24taas.com, सांगली 
जत तालुक्यातील ४२ गावांनी कर्नाटकात जाण्याचा दिलेला इशारा ही राष्ट्रवादीची राजकीय खेळी असल्याचा खळबळजनक आरोप वनमंत्री पतंगराव कदम यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी हा स्टंट केल्याचं कदम यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीला कर्नाटकात आपला पक्ष मजबूत करायचा आहे. त्यासाठी त्यांची ही राजकीय खेळी असल्याचा आरोप पतंगरावांनी केला आहे.
या ४२ गावातल्या नागरिकांनी पतंगरावांची आज भेट घेतली. त्यानंतर हे ग्रामस्थ महाराष्ट्रातच राहणार असल्याचा खुलासाही पतंगराव कदम यांनी केला आहे. कोण म्हणतं जत तालुक्यातील नागरिकांना कर्नाटकात जायचे आहे असा सवालच जणू पतंगरावांनी केला आहे.
First Published: Tuesday, May 1, 2012, 20:32