अजित दादांची माघार, बंडखोर अधिकृत - Marathi News 24taas.com

अजित दादांची माघार, बंडखोर अधिकृत

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
 
 
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण मंडळाच्या निवडणुकांच्या निमित्तानं सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधली अंतर्गत दुफळी पुन्हा एकदा उघड झालीय. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांवर माघार घेण्याची नामुष्की तर ओढवलीच पण बंडखोरांना अधिकृत करण्याची वेळही राष्ट्रवादीवर आली. ही अजितदादा पवारांची हार असल्याचे मानले जात आहे.
 
 
पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळासाठी अजित पवारांनी दहा उमेदवार जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात आमदार, शहराध्यक्ष अशा विविध गटांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. जवळपास २० हून अधिक अर्ज दाखल झाल्यामुळं निवडणुकीत जोरदार रस्सीखेच होणार हे स्पष्टच होतं.. एकही उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या तयारीत नव्हता. अखेर दादांना तसा निरोप पाठवण्यात आला. शेवटी शहराध्यक्ष आणि आमदारांची ताकत माहीत असल्यानं अजित पवारांनी नरमाईची भूमिका घेतली आणि बंडखोर उमेदवारांनाच अधिकृत करण्याचे आदेश दिले.
 
 
माघार घेतलेला उमेदवार नेहमी जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी तयार असलेले राष्ट्रवादीचे सुभेदार शिक्षण मंडळाच्या निवडनुकांनतर मात्र काहीही बोलायला तयार नाहीत. स्थानिक सुभेदारांसमोर अजित पवार यांना माघार घ्यावी लागली असली तरी शिरीष जाधव, नाना शिवले फासल शेख, निवृत्ती शिंदे सविता खुळे, श्याम आगरवाल यांच्यासह नऊ जण विजयी झालेत. त्यामुळ अजित पवारांनी नमतं घेतलं तरी अंमल मात्र दादांचाच असणार आहे.
 

First Published: Wednesday, May 2, 2012, 09:39


comments powered by Disqus