Last Updated: Wednesday, May 2, 2012, 19:13
www.24taas.com, पिंपरी-चिंचवड 
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण पाहाण्याची संधी यंदाही पिंपरी चिंचवडकरांना मिळणार आहे. यंदाही पिंपरी चिंचवडच्या एच ए मैदानावर तुकाराम पालखीचं गोल रिंगण १२ जूनला तारखेला होणार आहे.
तिथी मध्ये वाढ झाल्यामुळे पिंपरीत यंदाही पालखीच्या एका मुक्कामात वाढ झाली आहे त्यामुळं हा योग सलग दुसऱ्या वर्षी जुळून आला आहे.पिंपरी चिंचवड मध्ये जरी हे रिंगण होत असलं तरी पुणे आणि आसपासच्या परिसरातल्या भाविकानांही हा सोहळा अनुभवता येणार आहे.
त्यामुळं या रिंगण सोहळ्याचं सर्वांनाच आकर्षण आहे. त्यामुळे पिपंरी चिंचवडवासियांना माऊलींचा हा रिंगण सोहळा पुन्हा एकदा याची देही याची डोळा पाहता येणार आहे.
First Published: Wednesday, May 2, 2012, 19:13