नदी पात्रातल्या अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News 24taas.com

नदी पात्रातल्या अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
 
पिंपरी चिंचवडमधल्या नदी पात्रातल्या बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन दिलंय. पण फक्त पहाणीचा फार्स नको तर कारवाई करा, अशी मागणी होतेय.
 
पिंपरी चिंचवड मधल्या नदीपात्रात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम झालीयत. हे अतिक्रमण हटवण्याच्या मागणीकडे  सातत्यानं दुर्लक्ष करण्यात येतंय. आता अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी नदीपात्रातल्या बेकायदेशीर बांधकामाची पहाणी केलीय आणि कारवाई करण्याचं आश्वासनही दिलंय. पण अशा पहाण्या याआधीही अनेकवेळा झाल्यायत. पण कारवाई काहीच झालेली नाही. एवढंच नाही तर ज्या अधिका-यांनी पूररेषा बदलत बिल्डर्सचा फायदा करुन दिला होता त्यांच्यावरही कारवाई होत नसल्यानं नदी सुधार समितीनं तीव्र नाराजी व्यक्त केलीय.  हे अधिकारी जर दादांचा आदेश पळत नाही तर बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई कशी होणार असा प्रश्न विचारला जातोय.
 
दुसरीकड अतिरिक्त आयुक्तांनी मात्र लवकरच कारवाई करण्याचं पुन्हा एकदा आश्वासन दिलंय. नदी पात्रातल्या अतिक्रमणावर अजित पवारांनी अनेकदा नाराजी व्यक्त केलीय. दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही दिलेत. पण प्रत्यक्षात मात्र त्यांचे आदेशही पाळले जात नसल्याचं समोर आलंय. त्यामुळं नदी पात्रातलं अतिक्रमण कधी हटणार हाच खरा प्रश्न आहे.

First Published: Wednesday, May 2, 2012, 22:22


comments powered by Disqus