Last Updated: Thursday, May 3, 2012, 18:12
www.24taas.com, पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटांच्या दिवशीच दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातही स्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, अशी माहिती पुढे येतेय. याच प्रकरणी दहशतवादी महमद सिद्दिकीला ATS नं दिल्लीत अटक केलीय. त्याला काल रात्री पुण्यात आणण्यात आलं.
सिद्दिकी 27 वर्षांचा आहे. तो मुळचा बिहारचा आहे. जर्मन बेकरी स्फोटाच्या दिवशीच दगडूशेठ मंदिराच्या परिसरातच स्फोट घडवण्याचा इंडियन मुजाहिद्दीनचा प्लॅन होता. त्यासाठी दोन दिवस आधी सिद्दीकीनं मंदिराच्या परिसरात रेकी केली होती. दगडूशेठ मंदिर परिसरातल्या एका फूल विक्रेत्याकडे बॅग ठेवायची, असा दहशतवाद्यांचा प्लॅन होता. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी त्याची रंगीत तालीमही करण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी फूल विक्रेत्यानं बॅग ठेवून घेतली. पण जर्मन बेकरी बॉम्बस्फोटांच्या दिवशी ज्यावेळी सिद्दीकी बॅग ठेवायला गेला, त्या दिवशी दुकानदारांनं बँग ठेवून घ्यायला नकार दिला आणि मोठा अनर्थ टळला.
First Published: Thursday, May 3, 2012, 18:12