यूपीएससी संपूर्ण निकाल - Marathi News 24taas.com

यूपीएससी संपूर्ण निकाल

www.24taas.com, पुणे
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे यूपीएससीच्या परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार) जाहीर झाला असून त्यात शेना अग्रवाल हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्रातून अमृतेश औरंगाबादकर पहिला तर देशात दहावा आला.
 
देशातील पहिल्या दहात क्रमांकात चार मुलींचा समावेश आहे. तसेच पहिले दोन्ही क्रमांक मुलींनी पटकावले आहेत.  महाराष्ट्रातून निकिता पवार ही दुसरी तर देशात १८ वी आली आहे.
 
रवींद्र बिनवाडे याने तिसावा क्रमांक मिळविला आहे. विक्रांत पाटील 222 वा, रमेश घोलप 287 वा, महेश शिंगटे 306 वा, समृद्धी हांडे 323 वी, वैभव तांदळे 360 वा, शिवकुमार साळुंखे 361 वी तर सुशील घुले 467 आला आहे.

युपीएससीच्या संपूर्ण निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा


 

पहिले दहा क्रमांक पटकाविणा-यांची यादी


१)  शेना अग्रवाल
२) रुक्मिणी रियार
३) प्रिंस धवन
४) मंगेश कुमार
५) एस गोपाल सुंदर राज
६) गीतांजली ब्रांडन
७) हिमांशू गुप्ता
८) हर्षिका सिंह
९) डी कृष्ण भास्कर
१०) अमृतेश कालिदास औरंगाबादकर

First Published: Friday, May 4, 2012, 19:20


comments powered by Disqus