Last Updated: Sunday, May 6, 2012, 17:46
www.24taas.com, संगमनेर 
सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये बाळासाहेबांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी त्य़ांनी वाळू तस्करांवरील कारवाई करण्याचं आश्वासन कर्मचाऱ्यांना दिलं. शिवाय़ वाळू तस्करांवरील कारवाई रोखण्यासाठी दबाव आला तो झुगारुन कारवाई करा असे आदेश संबधितांना दिल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यातील महसुल अधिकारी कर्माचाऱ्यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून सात दिवस कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
दुष्काळी परिस्थिती पहाता आंदोलन मागे घ्यावे असे अवाहन केल्यांनतर कर्माचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेत आज महसुलमंत्र्यीच भेट घेत आपल्या मागण्यांचे निवदेन दिले.
First Published: Sunday, May 6, 2012, 17:46