Last Updated: Monday, May 7, 2012, 16:01
www.24taas.com, सोलापूर 
सोलापूरमध्ये पाण्यावरून रणकंदन पेटलं आहे. काँग्रेस आमदार दिलीप माने यांनी उजनी धरणाचे पाणी न मिळाल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली आहे.
तसंच अधीक्षक आणि अभिंयत्याला कोंडून ठेवलं आहे. पाणी मिळेपर्यंत अधिकाऱ्यांना सोडणार नसल्याची धमकीही माने यांनी दिली आहे. त्यामुळे आमदार हे स्वत: आक्रमक झाल्याने त्यांनी पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
राज्यभरात दुष्काळाने थैमान घातलेले असताना सरकारमधील आमदारच पाणी प्रश्नासाठी तोडफोड करीत असल्याने सरकार दुष्काळ प्रश्नावर कुचकामी ठरत आहे. त्यामुळे विरोधक मात्र आता सरकारला चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल हे नक्की.
First Published: Monday, May 7, 2012, 16:01