विद्यावती आश्रमाची मान्यता शेवटी रद्द ! - Marathi News 24taas.com

विद्यावती आश्रमाची मान्यता शेवटी रद्द !


झी २४ तास वेब टीम, पुणे
 
पुणे जिल्ह्यातल्या कामशेतजवळच्या विद्यावती अनाथाश्रमातील १४ वर्षांची मुलगी गरोदर असल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर प्रकरणातून काही नवीन धक्कादायक बाबी समोर आल्यात.
 
आश्रमातील १२ मुलं शासनाच्या महिला व बालकल्याण खात्याची परवानगी न घेताच परस्पर दत्तक दिल्याची माहिती पुढं आलीय. रेकॉर्डवरही १२ मुलांच्या नावांमध्ये खाडाखोड करण्यात आल्याचं उघड झालंय. २००२-०३ च्या दरम्यान आश्रमात १२ मुलं काही लोकांनी अनाथ म्हणून आणली होती. मात्र २००७ साली त्याच लोकांना ती मुलं परस्पर देण्यात आली आहेत. याबाबत आश्रम संचालक राजेश गुप्ता बोलण्यास तयार नाहीत.
 
मुलगी गरोदर असल्याचं बाब समोर आल्यानंतर इतर संशयास्पद गोष्टी समोर आल्यात. मुलीला सात महिने होईपर्यंत आश्रमाच्या लक्षात ही गोष्ट आली नव्हती. यावर मुलगी जाड असल्यानं लक्षात आलं नसल्याचं सुमार उत्तर संचालकांनी दिलंय. या सर्व घटनेनंतर महिला व बालविकास खात्यानं आश्रमाची मान्यता रद्द केली असून आश्रमातील ४४ मुलांना इतर आश्रमात पाठविण्यात आलंय.

First Published: Tuesday, November 29, 2011, 10:10


comments powered by Disqus