Last Updated: Tuesday, November 29, 2011, 11:57
झी २४ तास वेब टीम,पुणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातल्या कन्नडिगांच्या आंदोलनाचं पडसाद पुण्यातही उमटलेत. पुण्यातल्या प्रसिद्ध वैशाली हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आलीय.
कन्नड भाषिकाचे हे हॉटेल असल्यानं ही तोडफोड झालीय. फर्गसन कॉलेज रोडवरचे हे हॉटेल आहे. इथं नेहमी मोठी गर्दी असते. मराठी भाषिकांविरुद्ध गरळ ओकणाऱ्या चंद्रशेखर कंबार यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केल्याने कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेची विटंबना केली. यावढ्यावर न थांबता त्यांना देशद्रोही ठरविण्याची मागणी केली. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्नही केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बेळगावमधील प्रवीण शेट्टी नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील शेट्टींच्या हॉटेल्सवर हल्लाबोल केला. आता तर पुण्यातल्या प्रसिद्ध वैशाली हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आलीय. हे पडसात आता राज्यात उमटण्याची शक्यता आहे.
First Published: Tuesday, November 29, 2011, 11:57