आर.आर.आबा, हे वागणं बरं नव्हं ! - Marathi News 24taas.com

आर.आर.आबा, हे वागणं बरं नव्हं !

www.24taas.com, सांगली
 
गृहमंत्री आर. आर. पाटला यांनी जतचे पाणी तासगावला पळवल्याने जत तालुक्यात दुष्काळाची तीव्र स्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जतच्या सहाव्या टप्यातील मुख्य कालव्याचे काम पूर्ण असून हे पाणी मध्येच वळवल्याने हा भाग पाण्यापासून वंचित राहिला आहे.एक तर कायम दुष्काळी असा हा जत तालुका आहे, त्यातच जतचे पाणी पळवल्यानं येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
 
 
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पूर्व भागाला पाणी देण्याकरीता म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना १९८६ ला मंजूर करण्यात आली खरी, मात्र कामाला सुरुवात झाली ती १९९६ मध्ये. २२२४ कोटी रुपयांच्या या योजनेवर आत्तापर्यंत १०३६ कोटी रुपये खर्च झालेत. उर्वरित निधी मिळत नसल्यानं ही  योजना अपूर्ण आहे. मिरज, कवठे महांकाळ आणि जत तालुक्यासाठी ही योजना होती. मात्र २००4 मध्ये तासगाव  तालुक्यातील गावे या योजनेत समाविष्ट करण्यात आली. गव्हाण बंधा-यातून तासगावमधल्या गव्हाण, मणेराजुरी, अंजनी, नागेवाडी, योगेवाडी, वडगाव आणि उपळावी गावांना पाणी देण्यात  आले आहे.
 
 
जतच्या सहाव्या टप्यातील मुख्य कालव्याचे काम पूर्ण असून हे पाणी मधेच वळवल्याने हा भाग पाण्यापासून वंचित राहिला आहे.एक तर कायम दुष्काळी असा हा जत तालुका आहे, त्यातच जतचे पाणी पळवल्यानं येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पावसाचं अत्यल्प प्रमाण आणि अपूर्ण जलसिंचन योजनांमुळं या तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनुशेष आणि राजकीय  इच्छा  शक्तीच्या अभावामुळं या जलसिंचन योजना रखडल्यात.
 

First Published: Thursday, May 10, 2012, 13:09


comments powered by Disqus