'स्पा'च्या आड हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय - Marathi News 24taas.com

'स्पा'च्या आड हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय

www.24taas.com, पुणे
 
पुण्यात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय. कल्याणीनगरमधल्या एका ‘स्पा’वर छापा टाकून पोलिसांनी चार थाई तरुणींना अटक केलीय. गेल्या काही महिन्यांतली ही सहावी घटना आहे.
 
हाय प्रोफाईल सोसायटीमधला वेश्या व्यवसाय पुण्यात पुन्हा एकदा उघडकीला आलाय. कल्याणीनगरमधल्या स्पावर छापा टाकून पोलिसांनी चार थाई तरुणींना अटक केली आहे. गेल्या सहा महिन्यात व्यवसाय आणि सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांची आकडेवारी-
 
३१ ऑक्टोबर २०११ ला  जुनिय जोव्हा या रशियन तरुणीला फाइव्ह स्टार हॉटेल मधून अटक झाली होती
१९ नोव्हेंबर २०११ ला अजरा जान या काश्मिरी तरुणी आणि अभिनेत्रीला  फाइव्ह स्टार हॉटेल मधून अटक झाली.  
२९ नोव्हेंबर २०११ ला पद्मजा बापट या अभिनेत्रीला कोंढव्यात बेड्या घालण्यात आल्या.
२ जानेवारी २०१२ला शैला डेडी या घानाच्या तरुणीला येरवड्यात अटक झाली.
४ फेब्रुवारी २०१२ला करोलीन मारायाथासन या तमिळ अभिनेत्री आणि मॉडेलला अटक  झाली.
 
आता पुन्हा चार थाई तरुणींना अटक झाल्यानं हा प्रश्न चव्हाट्यावर आलाय. या घटनांमुळे पण्यात वेगळीच  संस्कृती उदयाला येताना दिसतेय. वाढते औद्योगिकीकरण, अनेक प्रांतातल्या लोकांची वस्ती अशा अनेक कारणांमुळे असे व्यवसाय वाढल्याचा अंदाज आहे. वेश्या व्यवसायाच्या निमित्ताने बदलणारी ही संस्कृती नक्कीच  चिंतेत टाकणारी आहे.
 
 

First Published: Thursday, May 10, 2012, 21:33


comments powered by Disqus