महिलेनं आरोपीला चपलेनं बडवलं - Marathi News 24taas.com

महिलेनं आरोपीला चपलेनं बडवलं

www.24taas.com, कोल्हापूर
 
कोल्हापूरमध्ये हत्येप्रकरणातल्या आरोपीला कोर्टाच्या बाहेर एका महिलेनं चांगलच थोबडले. महिलेला धमकावल्यानं चपलेनं या आरोपीला बडवलंय.  त्यामुळे बघ्यांचे मनोरंजन झाले.
 
नासीर काझी या तरुणाच्या हत्येचा आरोप असलेल्या सचिन गुंडकल्ली स्वामी यानं काझीच्या बहिणीला धमकी दिली होती. भावाचा खून आणि पुन्हा आरोपीकडून धमकी यामुळे चिडलेल्या बहिणीनं आरोपीला सर्वांसमोरच चपलेचा प्रसाद दिला. सचिन स्वामी हा जमीनावर आहे.
 
खटल्याची सुनावणी असल्यानं काझीची आई आणि दोन बहिणी कोर्टात आल्या होत्या. कोर्टातून बाहेर पडताना स्वामीनं काझीच्या बहिणीला धमकावलं. त्यामुळे तिनं सचिन स्वामीला चपलेनं बदडलं. अचानक झालेल्या या हल्ल्यानं स्वामीला तिथून पळ काढावा लागला. विशेष म्हणजे त्याचा पाठलाग करून काझीच्या बहिणीनं त्याला चोप दिला.
 
 
व्हिडिओ पाहा...
 

First Published: Friday, May 11, 2012, 14:53


comments powered by Disqus