Last Updated: Thursday, December 1, 2011, 12:04
झी २४ तास वेब टीम, पुणे सेक्स रॅकेट प्रकरणी पुणे पोलिसांनी पद्मजा बापटला अटक केली आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत पद्मजा बापटसह दोन महिलांना ऑर्किड पॅलेस इथे अटक केली. अभिनेत्री पद्मजा बापटने अनेक मराठी नाटके आणि सिनेमात काम केलं आहे.
पद्मजा बापटची प्रकृती बिघडल्याने तिला ससून रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर अटक करण्यात आलेल्या दोन महिला पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेच्या ताब्यात आहेत. पुण्यातच काही दिवसांपूर्वी हिंदी सिरीयलमध्ये काम करणाऱ्या एका मुळच्या काशिमीरी अभिनेत्रीला पंचतारांकित हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. पुण्यात गेली काही वर्षे सातत्याने पोलिसांच्या कारवाईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे.
First Published: Thursday, December 1, 2011, 12:04