पुण्यात ज्वेलर शॉप लुटण्याचा प्रयत्न - Marathi News 24taas.com

पुण्यात ज्वेलर शॉप लुटण्याचा प्रयत्न

www.24taas.com, पुणे
 
पुण्यात हडपसरमधील ओंकार ज्वेलर्सवर दरोडा घालण्याचा प्रयत्न झाला. गोळीबार करून दरोडा घालण्याचा 2 जणांनी प्रयत्न केला. मात्र दुकानाचे मालक आणि परिसरातल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळं हा दरोड्याचा प्रयत्न फसला. सुदैवानं गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही.
 
या दोघा जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. ओंकार ज्वेलर्समध्ये घुसलेल्या दोन चोरांनी आधी दुकान मालकाकडे सोन्याची चैन पाहण्यासाठी मागितली. मात्र, दुकान मालकानं त्यांना संध्याकाळी येण्यास सांगितलं. तेव्हढ्यात एक चोरानं पिस्तुल रोखलं. घाबरलेल्या दुकान मालकानं या चोरांच्या हाताला झटका दिला आणि नेम चुकून गोळी दुसरीकडे लागली. दुसरी गोळी झाडेपर्यंत अलार्मचे बटन दाबले. त्यामुळे आजूबाजूचे लोक धावून आले आणि त्यांनी एका चोराला पकडलं.
 
संतोष यादव असं या गोळीबार करणा-या चोराचं नाव आहे. तर, त्याचा साथीदार सोनू जोसेफ पळून जाण्यात यशस्वी झालाय. दुकान मालक आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे कुणीही जखमी झालेलं नाही तसंच चोराला पकडण्यात यश आलं.

 

First Published: Friday, May 11, 2012, 22:57


comments powered by Disqus