Last Updated: Saturday, May 12, 2012, 15:46
www.24taas.com, कोल्हापूर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली असली तरी त्यांच्या निशाण्यावर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार असल्याचे दिसून आले आहे. निर्यातीबाबत चुकीच्या धोरणामुळं राज्याला फटका बसत असून शेतक-यांचं नुकसान होत असल्याचं चव्हाण यांनी कोल्हापूर येथे सांगितले.
कापूस, कांदा आणि साखर निर्यातीवर बंदी घालू नये अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केलीय. निर्यातबंदी उठवली जाते तेंव्हा व्हायचं ते नुकसान झालेलं असतं असं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलयं. कोल्हापुरात एका कार्यक्रमात त्यांनी केंद्रावर ही टीका केली.
राज्यात कोरडवाहू शेतीचं प्रमाण मोठं आहे. त्यांच्या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टीनं पहायला हवं अशा शब्दात त्यांच्या व्यथा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडल्या. सिंचन असलेल्या भागात शेतक-यांना सवलती मिळतात मग जिथं पाणीच नाही तिथल्या शेतक-यांचा विचार व्हायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
First Published: Saturday, May 12, 2012, 15:46