पुण्यामध्ये देशातील पहिलं शावोलिन टेंपल - Marathi News 24taas.com

पुण्यामध्ये देशातील पहिलं शावोलिन टेंपल

www.24taas.com, पुणे
 
देशातल्या पहिल्या शावोलिन टेम्पलची स्थापना पुण्याजवळ मळवलीत करण्यात आली आहे. मार्शल आर्ट, कुंग फू, तसंच विपश्यनेचं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे.
 
चीनमधील शावोलिन टेम्पलची संकल्पना विविध चित्रपटांमधून पहायला मिळाली आहे.शाओलिन, शाओलिन पल, थर्टी सिक्स्थ चेंबर ऑफ शाओलिन टेंपल इत्यादी सिनेमांमधून शाओलिन टेंपलमध्ये घडवल्या जाणाऱ्या कराटे योध्द्यांची क्रेझ जगभरात निर्माण झाली होती. पुण्यातील या शावोलिन टेम्पलच्या माध्यमातून आता ती प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे.
 
चीनमधील पारंगतांच्या मार्गदर्शनाखाली या शावोलिन टेम्पलमधील उपक्रम चालणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षकांची फौजही तयार आहे. मर्यादित काळासाठीची शिबिरं तसंच दीर्घकालीन प्रशिक्षणाचीही सोय इथं उपलब्ध असणार आहे. देशातील कोणीही व्यक्ती या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतील.
 

First Published: Saturday, May 12, 2012, 19:03


comments powered by Disqus