मुंबई हिंसाचाराची माहिती दिली होती - केंद्रीय गृहमंत्री, The alert was Hinsachar Mumbai - Home Minister

मुंबई हिंसाचाराची माहिती दिली होती - केंद्रीय गृहमंत्री

मुंबई हिंसाचाराची माहिती दिली होती - केंद्रीय गृहमंत्री
www.24taas.com, सोलापूर

मुंबईतील सीएसटी हिंसाचार प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. या प्रकरणासंदर्भात राज्य सरकारला पूर्वसूचना दिली होती असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, आबांनीही मला माहिती नसल्याचे म्हटल्याने दोघांची जुपल्याचे दिसून आले.

हिंसाचार प्रकरणात सतर्कतेचं पत्रही देण्यात आल्याचा दावा शिंदेंनी केलाय. राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांना या पत्राबाबत माहित नसेल. मात्र पोलीस महासंचालकांना ते पत्र दिल्याचा दावा शिंदेंनी केलाय. सोलापुरात शिंदेंनी केलेल्या या विधानामुळं या प्रकरणात आणखी एक वळण आलंय.

मुंबईत ११ ऑगस्ट रोजी झालेला हिंसाचार हा पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळेच झाला, असा ठपका केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ठेवला आहे. एकीकडे राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची पाठराखण करत असताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी मात्र पोलिसांनाच जबाबदार धरलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरें मुंबई हिंसाचाराविरोधात गिरगाव ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. यावेळी त्यांनी आर आर पाटील आणि अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर अरुप पटनायक यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडीही करण्यात आली होती.

दरम्यान, आसाममधील हिंसेचा निषेध करण्यासाठी ११ ऑगस्टला रझा अकॅडमीने आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. त्यावेळी जमावाने अचानकपणे जाळपोळ आणि तोडफोड होती.

First Published: Monday, September 10, 2012, 10:37


comments powered by Disqus