...तर नारायण राणेंना राज्यभर नाकेबंदी, then narayan rane will bar in maharashtra

...तर नारायण राणेंना राज्यभर नाकेबंदी

...तर नारायण राणेंना राज्यभर नाकेबंदी

www.24taas.com, सांगली
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. या समितीने तीन महिन्यांच्या मुदतीत निर्णय घ्यावा; अन्यथा राणे यांना राज्यभर नाकेबंदी करू, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत दिला.

बराच काळ टोलवाटोलवी करून शासनाने फसवणूक केली आहे. आता पुरे झाले, मराठा समाज रस्त्यावर उतरल्यावर काय होते ते साऱ्यांनी पाहिले आहे. अंत पाहू नका, आरक्षणाचा निर्णय घ्या, असे आव्हान त्यांनी दिले.

राज्यभर रास्ता रोको करून मराठा समाजाने आरपारची लढाई सुरू केली. त्याची शासनाला दखल घ्यावी लागली. याआधी अनेकदा आश्वाससने देऊन फसवणूक केली होती, या वेळी आम्ही निर्णायक लढा उभा केला. त्यामुळेच समिती नेमली गेली. निर्णय घेण्यासाठी तीन महिने आहेत. तोवर राज्यभर फिरून प्रबोधन करणे आणि समितीच्या निर्णयाची वाट पाहणे, असा कार्यक्रम राहील, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

राणे यांना भेटून मागण्या, भूमिका समजावून सांगू. त्यांनी समाजातील सर्व घटकांना विश्वा सात घ्यावे, अशी विनंती करू. मुदतीत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास सांगली, कोल्हापूरसह राज्यभर त्यांना अडवू जाब विचारू, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

First Published: Thursday, March 28, 2013, 16:32


comments powered by Disqus