तळेगाव स्टेशनवरील सुटकेस बॉडीचं गूढ उलगडलंthree Nigeria youth arrested in Pune Siutcase murder case,

तळेगाव स्टेशनवरील सुटकेसमधील मृतदेहाचं गूढ उलगडलं

तळेगाव स्टेशनवरील सुटकेसमधील मृतदेहाचं गूढ उलगडलं
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

एका अज्ञात मुलीचा हात पाय बांधलेला मृतदेह तो ही सुटकेसमध्ये... तळेगाव रेल्वे स्टेशनवर बुधवारी ही बेवारास बॅग सापडली होती. त्या बॅगेतील मृत तरुणीची ओळख पटली असून तिची हत्या नायजेरियन नागरिकांनी केली, असा दावा पोलिसांनी केला आहे.

आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आलीय. या तरुणीचं नाव राणी सिंग असं असून ही तरुणी नालासोपारा इथं राहणारी असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. नालासोपारा परिसरात राहणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केलीय. हे तिघं नायजेरियन असल्याची माहिती मिळतेय.

बुधवारी तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनजवळ प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर पुरूष स्वच्छतागृहाजवळ एक बेवारस लाल रंगाची ट्रॉली बॅग सापडली होती. या बॅगेत एका तरूणीचा मृतदेह आढळला. तरूणीचं वय १६ असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तरूणीचे हात आणि पाय नायलॉनच्या दोरीनं बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. तरूणीनं पोपटी रंगाचा कुर्ता आणि हिरव्या रंगाची सलवार कमीज परिधान केली होती आणि तिच्या नाकात उजव्याबाजूला सोन्याची रिंग होती.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 14:18


comments powered by Disqus