`टोल`चा वेगळ्या पद्धतीने `व्हॅलेंटाईन डे ` , toll & Valentine Day in Kolhapur

`टोल`चा वेगळ्या पद्धतीने `व्हॅलेंटाईन डे `

`टोल`चा वेगळ्या पद्धतीने `व्हॅलेंटाईन डे `
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

राज्यात टोलविरोधात वातावरण आहे. मात्र, आज प्रेमाचा दिवस असल्याने हा दिवस कोल्हापुरातील तरुणाईनं आगळ्यावेगळ्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन डे साजरा केला. वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

कोल्हापुरात सध्या टोलचा प्रश्न गाजतोय... कोल्हापूरकरांचा आयआरबीच्या टोलला विरोध असतांनाही टोल वसूल केला जातोय... त्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरातील कॉलेज तरुण ताराराणी चौकात जमले होते. यावेळी गुलाबाची फुल घेऊन आलेल्या तरुणाईनं ही फुलं ताराराणीच्या पुतळ्याला समर्पित करत टोलविरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर हे तरुण तरुणी शिरोली टोलनाक्याकडे आयआरबीचा निषेध करण्यासाठी निघाले असतांना पोलिसांनी त्यांना अडवले.

पोलिसांनी अडवल्यानंतरही तरुण तरुणींची घोषणाबाजी सुरुच ठेवली होती. तर दुसरीकडे मुंबईतील मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. टोल न भरण्यासाठी हे कार्यकर्ते गाड्यांवर स्टिकर लावत होते. त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 14, 2014, 14:45


comments powered by Disqus