Last Updated: Thursday, January 30, 2014, 08:39
www.24taas.com, झी मीडिया, सांगली सांगलीतल्या सांगलीवाडीतील टोल रद्द करण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी टोल रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
सांगलीवाडीतील टोल प्रकल्पाला साडे सात कोटींचा खर्च आला होता. मात्र, ६५ कोटींच्या टोलची वसुली करण्यात आलीय. हा टोल रद्द झाल्यानं सांगलीकरांनी जल्लोष केलाय. सांगलीतल्या कृष्णा नदीच्या पुलावर १९९९ साली हा टोल नाका उभारण्यात आला होता. या टोलविरोधात सांगलीकरांचे गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरू होते. अखेर या टोलविरोधातल्या आंदोलनाला यश आलंय.
सांगलीतला टोल रद्द करण्यात आला असला तरी यानिमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
टोलबाबत `झी २४ तास`चे सवाल... * सांगलीकरांनी आंदोलन केले नसते तर टोल रद्द झाला असता का?
* सांगलीत अतिरिक्त टोल वसूल झाला आहे का?
* अतिरिक्त वसूल केलेली रक्कम सांगलीकरांना परत मिळणार का?
* राज्यात आणखी किती टोल आहेत जे तातडीने बंद करण्याची गरज आहे?
* त्याबाबतही सरकार तत्काळ निर्णय घेणार का?
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 30, 2014, 08:39