Last Updated: Wednesday, February 5, 2014, 14:11
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापुरात शिरोली टोल नाक्यावर टोल वसुलीला सुरुवात झाली आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्तात याठिकाणी टोल वसुलीला सुरुवात झालीय. कोल्हापूरकरांचा विरोध असतानाही IRB टोल वसुली करणार असल्याची भूमिका घेतलीय आहे.
दरम्यान, या टोलवसुलीविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेऊन महापौरांकडे आपले राजीनामे सुपूर्द केलेत. त्यानंतर सर्व नगरसेवक शिरोली टोल नाक्याकडे रवाना झालेत.
कोल्हापुरात सर्वात आधी टोलवसुली विरोधात आंदोलन झालं, टोलवसुलीविरोधात कोल्हापुरात सर्व पक्ष एकत्र आल्यानंतर आंदोलन झाल्याने काही काळ टोल वसुली बंद होती.
याकाळात टोल विरोधी आंदोलन समितीने उपोषणांचं आंदोलनही केलं होतं. तरीही टोल वसुली होत असल्याने आंदोलन चिघळून टोल नाक्यांची जाळपोळही झाली होती.
मात्र कोल्हापुरात पुन्हा टोल वसुली सुरू झाल्याने आता पुढे काय होणार, आंदोलकांची पुढची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 5, 2014, 12:43