तीव्र विरोधानंतरही कोल्हापुरात टोल वसुली toll continues in kolhapur

तीव्र विरोधानंतरही कोल्हापुरात टोल वसुली

तीव्र विरोधानंतरही कोल्हापुरात टोल वसुली

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

कोल्हापुरकरांचा तीव्र विरोध असतानाही पुन्हा एकदा आयआरबीकडून टोल वसुली सुरु झालीय.

शहरातील 9 पैकी 4 टोलनाक्यांवर ही टोलवसुली सुरु करण्यात आली आहे.

एमएसआरडीसीने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कोल्हापुरात टोलवसुली नको अशी विनंती राज्य सरकारनं आयआरबी कंपनीला केली होती.

याबाबात पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे शब्द हवेत विरत नाहीत, तोच आयआरबी कंपनीनं दुपारपासून टोलवसुली सुरु केली आहे. 

काही दिवसांपूर्वी कोल्हापुरकरांनी तिसरा महामोर्चा काढून टोलला केलेला विरोधही आयआरबीने झुगारलाय. 


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 17, 2014, 11:08


comments powered by Disqus