Last Updated: Wednesday, November 28, 2012, 08:31
www.24taas.com, कोल्हापूर कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसर आज पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघाला... निमित्त होतं त्रिपुरारी पौर्णिमेचं...
बोचरी थंडी असतानाही मिणमिणत्या हजारो पणत्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापुरकरांनी पंचगंगा घाटावर मोठी गर्दी केली होती. कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्थां आणि नागरिकांच्या सहभागातून दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदीवर हजारो पणत्या प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा केला जातो. यंदाही असंच विहंगम दृश्यं इथं पहायला मिळालं.
यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आकर्षक रांगोळी काढून त्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली तसच कसाबच्या फाशीची रांगोळीही लक्षवेधी ठरली. ही दीपोत्सव डोळ्यात साठवण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.
First Published: Wednesday, November 28, 2012, 08:29