ट्रक-बस अपघातात दोन्ही वाहने पेटली, एकाचा होरपळून मृत्यू, Trucks - Bus Accident on Pune Expressway

ट्रक-बस अपघातात दोन्ही वाहने पेटली, एकाचा होरपळून मृत्यू

ट्रक-बस अपघातात दोन्ही वाहने पेटली, एकाचा होरपळून मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुणे एक्सप्रेसवर तळेगाव दाभाडे टोलनाक्याजवळ भयानक घटना घडली. ट्रक आणि खासगी बस अपघातात एकाचा होरपळून मृत्यू तर दोन ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या अपघातानंतर बसचा कोळसा झालाय चर ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

दुरुस्तीसाठी थांबलेल्या बसवर ट्रक मागून जोराने धडकला. या अपघातानंतर व्हॉल्वो बस आणि ट्रकला आग लागली. या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झालीत. या अपघातात ट्रकचालकाचा होरपळून मृत्यू झाला असून दोन ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

बस एक्स्प्रेस-वेवर तळेगाव दाभाडे टोलनाक्याजवळ थांबलेली असल्यामुळे काही प्रवासी बसमधून खाली उतरलेले होते. बसमध्ये 35 प्रवासी होते. या अपघातानंतर सुदैवाने प्रवासी बचावले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 27, 2014, 11:02


comments powered by Disqus