संतांच्या माहेरघरातून दोन मुलींचं अपहरण!, two girls missing from navrange balkashram, pandharpur

संतांच्या माहेरघरातून दोन मुलींचं अपहरण!

संतांच्या माहेरघरातून दोन मुलींचं अपहरण!
www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूर

संतांचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरमधील नवरंगे बालकाश्रमातून नऊ आणि बारा वर्षांच्या दोन मुली गायब असल्याचं उघड झालंय.

सातवीत शिकणारी तेजस्विनी वर्मा आणि तिसरीत शिकणारी सोनल शेख या दोनी मुली मंगळवारी सकाळपासून गायब असल्याचं निदर्शनास आलं. या दोन्ही मुली शाळेत जाण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या गायब असल्याचं समजतंय. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर बालाकाश्रामाचे अधीक्षक वासुदेव दर्शने आणि त्यांच्या सहकार्यांनी या मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या मुलींचं अपहरण करण्यात आल्याचं बालकाश्रमाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. याबाबत पंढरपूर पोलिसांत गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलिसांनी या दोन्ही मुलींच्या तपासासाठी तीन पथकं रवाना केली आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 27, 2013, 19:33


comments powered by Disqus