Last Updated: Saturday, February 23, 2013, 22:55
www.24taas.com, सातारासाता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या हातानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवून घेतला...
साता-यात लक्ष्मी टेकडी इथं एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा योजनेचा नारळ आज पवारांच्या हातानी फुटला... यावेळी छत्रपतींचे वंशज असलेल्या उदयनराजेंनी आपल्या खास शैलीत पवारांचा हात स्वत: घेऊन स्वत:च्या डोक्यावर ठेवला. आणि त्यांचा आशिर्वाद घेतला... यावेळी उदयनराजे आणि पवार यांनी परस्परांवर स्तुतीसुमनंही उधळली...
एकाच पक्षात असूनही उदयनराजे आणि अजित पवारांमध्ये वारंवार शाब्दीक चकमकी झडल्या आहेत... शरद पवारांचा असा आपणहून आशिर्वाद घेत उदयनराजेंना काय सुचवायचंय हे त्यांनाच ठावूक...
First Published: Saturday, February 23, 2013, 22:55