Last Updated: Tuesday, July 16, 2013, 19:42
www.24taas.com, झी मीडिया, साताराराष्ट्रवादीचे चर्चीत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सात-यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या बिनधास्त शैलीत चौफेर टोलेबाजी केली. जनतेवर सातत्यानं अन्याय झाला तर जनतेचा उद्रेक होतोच असा टोला सांगलीतील पराभवावर उदयनराजेंनी लगावला
डान्सबार बंदीवर राज्याच्या सांस्कृतीक मंत्र्यांची प्रतिक्रीया घ्या असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मंत्रालयात सामान्य माणसांना प्रवेश मिळत नाही. शासन आणि प्रशासन यांच्यात संगनमत झाल्यानं कोण कुणाचे एजंट आहे हेच समजत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सध्या आपण उर्जीत अवस्था जागृत करण्याचा प्रयत्न करतोय असं सांगताना उदयन राजेंनी ऊर्जा मंत्र्यांनाही टोला लगावला. सगळीकडे इश्यूचा टीश्यू केला जातोय आणि टीशूचा इश्यू अशी कोपरखळीही त्यांनी लगावलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, July 16, 2013, 19:42