सुप्रियाचे मनावर घेऊन नका,Supriya Sule not take seriously the statement of the Chief Minister - Sharad Pawar

महिला सीएमचे मनावर घेऊन नका - शरद पवार

महिला सीएमचे मनावर घेऊन नका - शरद पवार
www.24taas.com,पुणे

महिला मुख्यमंत्रीपदाचं गांभिर्याने घेऊ नका, असा सल्ला माध्यमांना दिलाय तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी. कालच (शनिवारी) गोंदियात याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं होतं.

गोंदियात बोलताना महिला मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं होतं. त्यावर आज शरद पावारांना आज पुण्यात विचारलं असता त्यांनी हे गांभिर्याने घेऊ नका असं म्हटलय.

आगामी निवडणुकीत जो पक्ष जास्त ताकदीनिशी निवडमून येईल, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असं त्यांनी म्हटलय. मात्र त्याच बरोबर महिला मुख्यमंत्र्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलय. सुप्रियाताईंच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आगामी निवडणुकांमध्ये जो पक्ष सर्वात जास्त जागा जिंकेल, त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, तसेच महिला मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आली, तर त्याबाबतीत प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड हे निर्णय घेतील, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

First Published: Sunday, October 14, 2012, 20:07


comments powered by Disqus