Last Updated: Wednesday, May 14, 2014, 21:30
www.24taas.com, झी मीडिया, पुणे लोकसभेच्या मतदानावेळी अनेक मतदारांची नावे गायब झाल्याने लोकांनी खूपच नाराजी व्यक्त केली होती. पण आता विधानसभेतील निवडणुका जवळ असल्याने २६ मेपासून पुन्हा मतदारनोंदणी सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी सौरव राव यांनी ही माहिती दिली.
यावेळी मतदार नोंदणी मोहिमेत अर्ज करणारा मतदार नवीन आहे की नाव गहाळ झाल्याने पुन्हा अर्ज करतं आहे, याबाबतचे अतिरिक्त घोषणापत्र खास पुण्यात भरून घेण्यात येणार आहे याची माहिती राव यांनी दिली. गहाळ झालेल्या आणि नवीन मतदारांची नोंदणी, नाव आणि पत्ता, तसेच वय आणि फोटो अशा तपशीलांची चुका दुरुस्ती करणे आणि नाव वगळण्याची प्रक्रिया या मोहिमेत सुरू असेल.
राज्यात अनेकांची नावे गहाळ झाल्याने फार मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अनेक तक्रारी आल्याने अशा तक्रारींची चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 14, 2014, 21:30