Last Updated: Sunday, February 17, 2013, 00:09
www.24taas.com, कोल्हापूरकोल्हापुरात तीन दिवसांपूर्वी भरदिवसा झालेल्या अशोक पाटील यांच्या खून प्रकरणी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचा संबंध असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक गटाचे धनंजय महाडिक यांनी केला आहे.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या मंत्रीपदाबरोबरच आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि नार्को चाचणीला सामोरं जावं असं जाहीर आवाहन धनंजय महाडिक यांनी केलं आहे.
कोल्हापुरात बुधवारी दुपारी झालेल्या पाचगावचे माजी सरपंच अशोक पाटील यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सतेज पाटील यांचं नाव पुढे आलं होतं त्यामुळे पाटील मात्र चांगलेच अडकल्याचं दिसतंय.
First Published: Sunday, February 17, 2013, 00:06