Last Updated: Tuesday, May 27, 2014, 16:12
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूरनिवडणुकीपूर्वीच आपल्याच लोकांकडून धोका असू शकतो हे माहित होतं. त्यामुळंच पराभवाला सामोर जावं लागलं, असं सुशील कुमार शिंदेंनी सांगितलं. त्याचप्रमाणे अंतर्गत राजकारणामुळे माझा पराभव झाला असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मी हरणार हे मला आधीच कळलं होतं, कारण आपलीच माणसं विरोधात काम करत होती. पण माझं नशीब चांगलं की डिपॉझिट जप्त झालं नाही,` अशी कबुली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरात दिली.
`मला राजकारणातून निवृत्त व्हायचं होतं. पण पक्षानं आदेश दिल्यानं निवडणूक लढलो. माझा पराभव हा जनादेश आहे. तो स्वीकारायला हवा. त्यासाठी राहुल गांधी कारणीभूत नाहीत,` असंही शिंदे यांनी आवर्जून नमूद केलं. यापुढं राजकारण करणार नसून पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सोलापूरमध्ये भाजपच्या शरद बनसोडे यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला होता.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 27, 2014, 16:09