त्याने चक्क एसटी बस चोरली

त्याने चक्क एसटी बस चोरली

त्याने चक्क एसटी बस चोरली
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर

सोलापूरमध्ये एसटी डेपोबाहेर एका व्यक्तीने आज पहाटे सोलापूर परिवहन सेवेची बसच चोरण्याचा प्रयत्न केला. सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला. पोलिसांनी सतर्कता बाळगून बस चोरट्याला अटक केली.

सकाळी साडेसहा वाजता सोलापूर परिवहन सेवा सुरू होते. त्यानुसार बसचालक आणि वाहकाने सकाळी बस डेपोतून बाहेर आणली. त्यानंतर काही कार्यालयीन नोंदी करण्यासाठी ते डेपोत गेले असता एका व्यक्तीने बसचा ताबा घेतला आणि बस भरधाव वेगाने तो घेऊन गेला. काही कळायच्या आतच बस निघून गेली होती.

सोलापुरात सध्या गड्डा यात्रा सुरू आहे. त्यामुळे बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. भरधाव वेगाने जाणारी ही बस पाहून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी बस अडवली. चौकशी केल्यावर बस चोरल्याचं लक्षात आलं आणि चोरट्याला अटक करून बस ताब्यात घेतली.

बस चोरट्याचं नाव देवेंद्र सिंग असं आहे. या व्यक्तीवर याआधीही काही गुन्हे दाखल आहेत का याचाही तपास पोलीस करत आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 14, 2014, 20:42


comments powered by Disqus