पिंपरी चिंचवडमध्ये ‘वॉन्टेड’ पोलीस!Where is Police in Pimapri-Chichwad, Crime rate increase in this

पिंपरी चिंचवडमध्ये ‘वॉन्टेड’ पोलीस!

पिंपरी चिंचवडमध्ये ‘वॉन्टेड’ पोलीस!
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालाय. सरासरी २ सोन साखळी चोऱ्या, दर आठवड्याला एक बलात्कार आणि हत्या हे चित्र आहे बेस्ट सिटीचं.. एरव्ही वांटेड म्हणून गुन्हेगारांचं वर्णन केलं जायचं. पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र आता पोलीसच वॉन्टेड आहेत की काय, अशी स्थिती निर्माण झालीय.

पिंपरी-चिंचवड अर्थात पुणे पोलीस परिमंडळ तीनमध्ये सध्या पोलीस करतायत काय... असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. त्याला कारण ही तसंच आहे. काही दिवसांपूर्वी वाकड मधल्या दिवसा ढवळ्या झालेल्या १८ घरफोड्या, त्यानंतर बावधन मध्ये झालेल्या ८ घरफोड्या… आणि हे कमी होतं म्हणून दिवसा सरासरी दोन या प्रमाणं महिलांच्या गळ्यातल्या दागिन्यांची होणारी चोरी… हे चित्र आहे पिंपरी चिंचवडमधल्या ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचं..

वर्षाचा विचार केला तर शहरात ४८ बलत्कार झालेत तर ५० हून अधिक हत्या… वाढत्या गुन्हेगारीमुळे हैराण झालेल्या पिंपरी चिंचवडकरांमध्ये त्यामुळं पोलिसांबद्दल कमालीची नाराजी पसरलीय.

एकीकडे नागरिक एवढे हवालदिल असताना पोलीस मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. एकीकडे पिंपरी चिंचवड सर्वाधिक वेगानं विकसित होणारं शहर असा गवगवा केला जातोय. पण दुसरीकडे कायदा सुव्यवस्था मात्र पुरती कोलमडलीय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 30, 2013, 22:26


comments powered by Disqus