राज ठाकरेंशिवाय सत्तांतराची ताकद महायुतीत- आठवले, without raj thackeray maha yuti will bring change - athavale

राज ठाकरेंशिवाय सत्तांतराची ताकद महायुतीत- आठवले

राज ठाकरेंशिवाय सत्तांतराची ताकद महायुतीत- आठवले

www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूर

राज ठाकरे यांना बाजूला ठेवूनदेखील राज्यात सत्तांतर घडविण्याची ताकद शिवसेना-भाजप अन् रिपाइंच्या महायुतीत आहे, असे प्रतिपादन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

आठवले काल पंढरपूर दौर्याचवर होते. राज ठाकरे यांच्या मनसेने महायुतीत यावे या त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करताना ते म्हणाले, राज यांना महायुतीत घ्यायचे की नाही याचा सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे. येत्या आठवडाभरात शिवसेना-भाजप व रिपाइंची नेतेमंडळी या विषयावर बसून चर्चा करणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय होईल.

पण मनसेशिवायदेखील राज्यात सत्तांतर करण्याची शिवसेना-भाजप आणि रिपाइं महायुतीत ताकद आहे. महायुतीची सत्ता आल्यानंतर ज्याच्या जागा जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद रिपाइंला, असा आपला आग्रह असणार आहे. दोन्ही पक्षांनी रिपाइंला उपमुख्यमंत्रीपद देण्याचे मान्य केले तर राज्यातील दलित वर्ग महायुतीच्या मागे अधिक मजबुतीने उभा राहील, असा विश्वास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 2, 2013, 08:42


comments powered by Disqus