पुण्यात महिलेला विवस्त्र करून दिला शॉक, woman is given electric shocks in pune

पुण्यात महिलेला विवस्त्र करून दिला शॉक

पुण्यात महिलेला विवस्त्र करून दिला शॉक
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेला विवस्त्र करून तब्बल सहा तास मारहाण करून विजेचा शॉक देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

महिलेला विवस्त्र करून तब्बल सहा तास मारहाण प्रकरणी इंदापूर पोलिसांनी मात्र हा गुन्हा अदखलपात्र नोंद करून त्या महिलेच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार केला. चोरीचा आळ घेऊन महिलेला ही मारहाण करण्यात आली. ही महिला भटक्या विमुक्त जमातीतली आहे.

राजवडी भागातील कदम वस्तीत ती जवळच्या वस्तू विकण्यासाठी आली असतांना आरोपी बाळू शेलारच्या पत्नीने तिच्याकडून वस्तू विकत घेतल्या. याच दरम्यान या महिलेनं लहान मुलाच्या हातातील सोन्याचा दागिना चोरल्याचा संशय घेऊन, बाळू शेलारच्या पत्नीने तिला जबर मारहाण करून विवस्त्र केलं. तरीही दागिना मिळत नसल्यानं तिला विजेचा शॉक देण्याचा प्रयत्न केला.

विवस्त्र करून तब्बल सहा तास महिलेला मारहाण करून विजेचा शॉक दिणे हे सर्व अमानुष कृत्य सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत म्हणजेच तब्बल ६ तास सुरु होतं. या निंदनीय घटनेचा निषेध करून आंदोलन करण्याचा इशारा पश्चिम महाराष्ट्र भटक्या विमुक्त जातीचे अध्यक्ष तानाजी धोत्रे यांनी दिला आहे.

पाहा व्हिडिओ





* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 16, 2013, 14:56


comments powered by Disqus