बाळाचा अमानुष छळ करणाऱ्या बाईला अटक, Women that the child inhuman abuse arrested

बाळाचा अमानुष छळ करणाऱ्या बाईला अटक

बाळाचा अमानुष छळ करणाऱ्या बाईला अटक
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

एका लहानग्याचा छळ करण्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. हे वृत्त सगळीकडे पसरताच पोलिसांनी त्या आरोपी महिलेवर अटकेची कारवाई केली. मुलाला सांभाळणाऱ्या बाईनं या मुलाला अमानुषपणे बिनबॅग आणि बेड वर आपटलं होतं.

हे मुल अवघ्या ११ महिन्यांचं आहे. आपण पहात असलेली ही दृश्य आपल्याला विचलीत करू शकतात, सुदैवानं या मुलाला गंभीर दुखापत झालेली नाही. घरात बसवलेल्या सीसीटीव्हीमुळे हा अमानुष प्रकार समोर आलाय. या महिलेविरुद्ध दत्तवाडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. तपासाअंती बेबी लक्ष्मण पाटोळे या आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

या बाळाचे आई-वडील आयटी कंपनीत नोकरी करतात. त्यांनी मुलाला सांभाळण्यासाठी या बाईला कामाला ठेवले होते. या कुटुंबाकडे ही बाई एका एजन्सी मार्फत कामाला लागली होती. मुलाला आपटण्याआधी या बाईने आधी घरातील लाईट बंद केले. लाईट बंद केल्याने सीसीटीव्ही मध्ये घडलेला प्रकार दिसणार नाही, असा अंदाज या बाईचा होता. मात्र सीसीटीव्ही ला नाईट व्हिजन असल्याने सर्व दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली.

पाहा कसा केला छळ


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 14, 2014, 15:32


comments powered by Disqus