पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून सहा ठार, Workers suffered death by falling slab building in Pune

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून १३ ठार

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून १३ ठार
www.24taas.com,पुणे

पुण्यातल्या वाघोलीजवळ इमारतीचा स्लॅब कोसळला असून ढिगा-याखाली अडकून १३ जण ठार झालेत. ढिगा-याखाली आणखी काही कामगार अडकल्याची शक्यता आहे. आय़ुर्वेद कॉलेजचे बांधकाम सुरु असताना ही घटना घडलीय.

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास पुणे - नगर रस्त्यावरील वघोली परिसरात असणाऱ्या आय़ुर्वेद महाविद्यालयाजवळील इमारत अचानक कोसळली. त्यामुळे मजुरांना परळण्यास वेळही मिळाला नाही.

ढीगाऱ्या खालून सहा जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ढिगा-याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होतं. या अपघातामध्ये १० ते १५ जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत होती. दरम्यान, सायंकाळी उशीरा आणखी मृतदेह काढण्यात आलेत. त्यामुळे मृतांचा आकडा १३ वर गेलाय.

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून बचाव कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहेत.

First Published: Tuesday, December 18, 2012, 18:44


comments powered by Disqus