Last Updated: Wednesday, January 23, 2013, 12:54
www.24taas.com, मुंबईयुवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची शिवसेनेच्या नेतेपदी निवड होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आदित्य ठाकरेंची जर नेतेपदी निवड झाली तर ते आपले काका आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सर्वात तरूण वयात शिवसेना नेता होण्याचा विक्रम मोडीत काढणार आहेत.
राज ठाकरे यांची वयाच्या २९व्या वर्षी शिवेसेना नेतेपदी निव़ड झाली होती. तर आदित्य ठाकरेंची वयाच्या २३व्या वर्षीच नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. मात्र या दोन्ही काका-पुतण्यांमध्ये एक लक्षवेधी असा राजकीय योगायोग आहे.
राज ठाकरेंची १९८९ साली वयाच्या २१ व्या वर्षी भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. तर आदित्य ठाकरेंचीही २०१० मध्ये वयाच्या २१ व्या वर्षीच युवासेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
First Published: Wednesday, January 23, 2013, 12:35