राज ठाकरेंवरचं अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द, arrest warrant against raj thackeray canceled

राज ठाकरेंवरचं अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द

राज ठाकरेंवरचं अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेलं अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यात आलंय. त्यामुळे, निश्चितच राज ठाकरेंना दिलासा मिळालाय.

राज ठाकरे यांच्याविरुद्ध प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेला अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. शेटे यांनी दिले आहेत.

जमशेदपूर येथील न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर वाहेगाव देमणी येथे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी एस. टी. बसेसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी करमाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाची नुकतीच सुनावणी झाली असता प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यावर अजामीन पात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातर्फे अॅड ए. के. ठाकरे यांनी सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्जाद्वारे ‘वॉरंट रद्द करावे व या आदेशास तात्पुरती स्थगिती द्यावी’ अशी विनंती केली होती. या पुनर्विलोकन अर्जावर गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. शेटे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असता त्यांनी अजामीन पात्र वॉरंटला तात्पुरती स्थगिती देण्याची विनंती मान्य करीत न्यायालयाने वॉरंट बजावण्यास तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश पारित केले.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 07:50


comments powered by Disqus