कृषी उत्पन्न बाजार समितीत मनसेची तोडफोड MNS attack on APMC Market

कृषी उत्पन्न बाजार समितीत मनसेची तोडफोड

कृषी उत्पन्न बाजार समितीत मनसेची तोडफोड
www.24taas.com, अमरावती

इंडियाबुल्सच्या ऑफिसवर हल्ला केल्यानंतर मनसैनिकांनी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हल्लाबोल केला आहे. मनसैनिकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत तोडफोड केली. तिथल्या परप्रांतीय कामगारांना मनसैनिकांनी हुसकावून लावलं. तोडफोड करून पळणारे जाताना मनसेचा झेंडा लावून पळाले.

या आधी अमरावतीच्या इंडियाबुल्स कार्यालयावरही मनसेनं हल्ला केला. संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी या कार्यालयाची तोडफोड केली. राज ठाकरेंनी काल अमरावतीमध्ये झालेल्या जाहीर सभेत इंडियाबुल्सवर जोरदार टीका केली होती. राज ठाकरेंच्या या भाषणाचे पडसाद मुंबईपाठोपाठ अमरावतीमध्येही उमटले.


मुंबईतील परळमधल्या इंडीया बुल्सच्या कार्यालयाला मनसे कार्यकर्त्यांनी लक्ष्य केलं. कार्यकर्त्यांनी कंपनीच्या सिक्युरिटी ऑफीसची तोडफोड केली. या प्रकरणी पाच मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांना आज भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणी त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

First Published: Monday, March 25, 2013, 16:40


comments powered by Disqus