आज जळगावात धडकणार राज; कार्यकर्त्यांची धावपळ, MNS leaders to welcome Raj Thakare in Jalgaon

आज जळगावात धडकणार राज; कार्यकर्त्यांची धावपळ

आज जळगावात धडकणार राज; कार्यकर्त्यांची धावपळ
www.24taas.com, मुंबई

राज ठाकरेंची ७ एप्रिलला जळगावामध्ये जाहीर सभा होणार आहे. यासाठी मनसे कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. तर राज ठाकरे त्या सभेसाठी आजच जळगावात दाखल होणार आहेत.

मराठा आरक्षणासारखे मुद्दे फक्त मत विभाजनासाठी करण्यात आलेलं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. यावेळी त्यांनी गुजरातचंही कौतुक केलं. 7 एप्रिलला होणा-या सभेत जनतेचे प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय हा दौरा दुष्काळासाठी नसून पक्षबांधणीसाठी असल्याचं त्यांनी सांगितलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौ-याला सुरुवात झाली आहे. ७ एप्रिलला राज यांची जळगावात जाहीर सभा होणार आहे. सागर पार्कवर होणा-या या सभेची मनसे कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे.

First Published: Saturday, April 6, 2013, 10:15


comments powered by Disqus