Last Updated: Tuesday, February 19, 2013, 11:05
www.24taas.com, पनवेलशाही विवाह सोहळे महाराष्ट्रात चांगलेच रंगू लागले आहेत. कृषीमंत्री शरद पवार यांनी तंबी दिल्यानंतरही राष्ट्रवादीचे अनेक नेते शाही सोहळे करण्यातच मग्न आहेत. मात्र आता राष्ट्रवादीनंतर मनसे आमदारही त्याबाबतीत पाठी राहिलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री भास्कर जाधव यांच्या घरच्या राजेशाही लग्नाची चर्चा कायम असताना आता मनसे आमदार रमेश पाटील यांच्या मुलाच्या लग्नाची चर्चा आता रंगू लागली आहे.
कल्याणचे मनसे आमदार रमेश पाटील यांच्या मुलाचं लग्न अलिबाग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नारायण शेठ ठाकूर यांच्या मुलीशी झालं. लग्नाच्या आमंत्रणाचे बोर्ड अगदी सायन-पनवेल रस्त्यापासून लावण्यात आले होते. आणि सोहळ्यासाठी भव्य शामियाना मांडण्यात आला होता.
त्यामुळे या लग्नाची श्रीमंतीची चर्चा पनवेल भागात रंगली होती. आता राज ठाकरे आमदारांच्या या वर्तणुकीवर प्रतिक्रिया देणार का असा सवाल विचारला जातो आहे...
First Published: Tuesday, February 19, 2013, 09:20